ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
<em>सोनाळी सोसायटीवर भाजपाचा झेंडा..!</em>

<em>सोनाळी सोसायटीवर भाजपाचा झेंडा..!</em>

प्रकाशन: 27 Apr 2022 10:03 PM
वाचन संख्या 215

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल प्रमुख अरविंद रावराणे व सहकार्यांची कामगिरी.

वैभववाडी | नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
सोनाळी येथील ग्रामसेवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय संपादन केला आहे. भाजपा विरुद्ध शिवसेना यांच्यात ही निवडणूक झाली. ग्रामपंचायत निवडणुकीतील वचपा काढत भाजपाने सोसायटी निवडणुकीत सेनेला चारीमुंड्या चित केले आहे.

भाजपा पॅनेलसाठी आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत भाजपाने १३ पैकी १० जागांवर मोठा विजय मिळविला आहे. शिवसेनेला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावे लागले. पॅनेलचे प्रमुख, माजी सभापती अरविंद रावराणे यांचे आम नितेश राणे व भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. पावणादेवी ग्राम विकास सेवा पॅनेल (भाजपा पुरस्कृत) तर परिवर्तन ग्रामविकास सेवा पॅनेल (शिवसेना पुरस्कृत) यांच्यात लढत झाली.
भाजपा विजयी उमेदवारमध्ये अरविंद भास्कर रावराणे, प्रशांत भिकाजी पवार, संजय लक्ष्‍मण साळसकर, सचिन राजाराम कोदे, समाधान तुकाराम जाधव, प्रकाश मारुती शेलार, शितल गजानन गुरव, शारदा बाळकृष्ण तळेकर, प्रवीण तानाजी भोसले, रवींद्र गुलाबराव चव्हाण यांचा समावेश आहे. इतर विजयी उमेदवार मध्ये अशोक शिवाजी रावराणे, संदिप शांताराम शिंदे, विश्वनाथ गणपत पवार यांचा समावेश आहे.

सोनाळी येथे बुधवारी निवडणूक शांततेत पार पडली. सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने १३ पैकी १० जागांवर विजय मिळविला आहे. विजयानंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विजयी जल्लोष केला. यावेळी संतोष कोलते, मनोहर तळेकर, समाधान गुरव, रमेश पवार, रवी शेलार, शांतेश रावराणे, दिपक कारेकर, संतोष सुतार, संतोष शिरावडेकर, मनोहर गुरव, मारुती पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नुतन संचालक यांचे गावात अभिनंदन केले जात आहे.

पॅनेलप्रमुख अरविंद रावराणे म्हणाले, या विजयानंतर विरोधकांना आपली जागा समजली असेल. गावचा विकास हा केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातूनच झाला आहे. हे या विजयातून ग्रामस्थांनी दाखवून दिले. या पुढील सर्व निवडणुकांमध्ये १०० टक्के विजय हा भाजपाचा असेल असं सांगितलं. या निवडणुकीत परिश्रम घेणाऱ्या सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अरविंद रावराणे यांनी आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स