ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे कावावाडी येथे हनुमान जन्मोत्सव....!

मसुरे कावावाडी येथे हनुमान जन्मोत्सव....!

प्रकाशन: 14 Apr 2022 04:18 PM
वाचन संख्या 97

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री देव हनुमान मंदिराचा १२ वा वर्धापनदिन सोहळा, श्री हनुमान जन्मोत्सव, आणि ग्रामदेवता श्री देव जैन भरतेश्वर व मसुरे गावरहाटीच्या देवता यांच्या देवस्वारीच्या औचित्याने शुक्रवार दिनांक १५ एप्रिल ते सोमवार १८ एप्रिल २०२२ या कालावधीत जयबजरंगबली नाट्य मंडळाच्या भव्य रंगमंचावर विविध सांस्कृतिक, धार्मिक , आरोग्य , शैक्षणिक विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ एप्रिल २०२२
सकाळी ८ ते सकाळी १०- अभिषेक, लघुरुद्र.
सकाळी १० ते १ सत्यनारायण महापूजा, आरती. रात्रौ १० वाजता जय बजरंगबली नाट्य मंडळाचा “माझ्या सासरच्या मंदिरी” नाट्यप्रयोग होणार आहे.
१६ एप्रिल रोजी
पहाटे ५ वा कीर्तन, हनुमान जन्मोत्सव, श्री देव हनुमान पालखी सोहळा, महाआरती. दुपारी १ वा महाप्रसाद. सायं ५ ते ७ गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत कार्यक्रम,
सायंकाळी ७ ते ९ शालेय विद्यार्थी गुणगौरव( सौजन्य मसुरे भंडारी समाज सेवा संघ मुंबई व कै लक्ष्मण वासुदेव जुवेकर यांच्या स्मरणार्थ ).
रात्री १० वाजता गोरे दशावतार नाट्य मंडळ,
यांचा रुई महात्म्य हा दशावतार नाट्य प्रयोग.
१७ एप्रिल
सकाळी ९ ते १ रक्तदान शिबिर, सायंकाळी ५ वा. मसुरे गावऱ्हाटीच्या देवस्वारीचे आगमन. रात्रौ ८ वा महाप्रसाद, पंचक्रोशीतील तसेच शिवरामेश्वर भजन मंडळ आचरा ( बुवा रवी गुरव), विठ्ठल प्रा भजन मंडळ ( बुवा विशाल मसुरकर), श्री देव दत्त प्रासादिक भजन मंडळ मागवणे ( बुवा अजय दुखंडे) यांचे भजन.१८ एप्रिल दुपारी महाप्रसाद,
दुपारी ३ वा. मसुरे गावऱ्हाटीच्या देवस्वारीचे कावावाडी येथून प्रस्थान.
आयोजित सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन
मसुरे भंडारी समाज सेवा संघ मुंबई तसेच स्थानिक कार्यकारिणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स