वडाचापाट ग्रामपंचायत नूतन इमारत लोकार्पण सोहळा १५ एप्रिल रोजी....!
दोन दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वडाचापाट ग्रामपंचायत कार्यालय नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा १५ एप्रिलला सायंकाळी ४ वा आयोजित करण्यात आला आहे. उदघाटन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी राजेंद्र पराडकर, उप मुख्य कार्य अधिकारी विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, अनिल आवटी, संतोष सावर्डेकर, तुषार पाटकर आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्याला सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन सरपंच सौ नमिता कासले, उपसरपंच श्री कृष्ण पाटकर यांनी केले आहे. यानिमित्त १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता उदघाटन, स्वागत, मनोगत, ५ वा. स्वराज्य महिला ढोल पथक यांची मानवंदना, रात्री १० वाजता कै सुधीर कलिंगण प्रस्तुत ट्रिकसिनयुक्त ‘ अजिंक्यतारा’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री गणेश पूजन, सत्यनारायण महापूजा, दुपारी आरती, दुपारी ३वा हळदीकुंकू, सायंकाळी स्थानिक भजने, रात्री १० वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे 7 हजार 1, 5 हजार 1, 3 हजार 1 तर उतेजनर्थ दोघांना 1 हजार 1 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी १४ एप्रिल पर्यंत नाव नोंदणी सुगंधी बांदकर (9423947631),
साईप्रसाद देसाई(9404944336) यांच्याकडे करावी असे आवाहन या सोहळ्याच्या सांस्कृतिक विभागाकडून करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)