मसुरे येथे रामनवमी उत्सव उत्साहात साजरा..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम’ अशा नामघोषात मसुरे देऊळवाडा येथील ग्रामदैवत श्री देव जैन भरतेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात हजारो भविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला.
या उत्सव काळात सकाळी श्रीची विधिवत पूजा, श्री सुधाकर जोशी यांनी पुराण वाचन केले. श्री रामजन्म कथा कीर्तन सादर केले. मध्यान्ह दुपारी १२ वा. रामजन्म सोहळा “रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम” या नामघोषात भक्ति भावनेने पार पडला. यानंतर मंदिराच्या भोवताली श्रीची पालखी प्रदक्षिणा ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली. उपस्थित भविकांना मंडळाकडून महाप्रसाद देण्यात आला.या कार्यक्रमाला गावचे मानकारी, ग्रामस्थ व दशक्रोशितिल हजारो भाविक उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)