ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वराड येथे ११ रोजी राणे महाराज पुण्यतिथी…!

वराड येथे ११ रोजी राणे महाराज पुण्यतिथी…!

प्रकाशन: 07 Apr 2022 11:21 AM
वाचन संख्या 48

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर:रामनवमी उत्सव आणि प. पू. राणे महाराज यांच्या सातव्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त १० व ११ एप्रिल रोज़ी वराड कट्टा कुसरवेवाडी येथील प. पू राणे महाराज मठ येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रामनवमी उत्सवानिमित्त १० रोजी सकाळी ९ वा. मूर्ती अभिषेक, १० वा. रामजन्म कीर्तन, दुपारी १२ वा. रामजन्म सोहळा, १ वा. महाआरती, १.३० वा. महाप्रसाद (अखंड सुरू), सायंकाळी ७ वा. संजय दळवी, तळगाव यांचे भजन, रात्री ९ वा. जय शंभो भजन मंडळ, माजगाव, सावंतवाडी यांचे भजन, राणे महाराजांच्या सातव्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त ११ रोजी सकाळी ९ वा. महाराजांच्या पादुकांवर अभिषेक, सकाळी ९ वा. हरिपाठ, दुपारी १२ वा. महाआरती, १.३० वा. महाप्रसाद, दुपारी ४ वा. पालखी मिरवणूक (कै. गुरुनाथ म्हाडगृत, कट्टा यांचे घर ते प. पू. राणे महाराज मठ), सायंकाळी ७ वा. स्वामी समर्थ भजन मंडळ भांडूपचे बुवा सुशिल गोठणकर व विमलेश्वर भजन मंडळ, परेलचे बुवा दुर्वास गुरव यांच्यात आमने-सामने संगीत डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स