आज बांद्यात सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्यूसर कंपनीचे झाले उद्घाटन...!
बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडचे दहा हजार शेअर्स सभासदांसाठी विक्रीस काढले आहेत. व त्या माध्यमातून दहा लाख अधिकृत भाग भांडवल उभे रहाणार आहे. कंपनीच्या या विक्री शेअर्सना शेतकरी बागायतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून विहित कालावधी पुर्वीच शेअर्स खरेदी होऊन कंपनी शेतकर्यांच्या उत्पादन खरेदीस सुरुवात होईल असा ठाम विश्वास कंपनीचे अध्यक्ष विलास सावंत यांनी बांदा येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. मंगळवार १५ फेब्रुवारी रोजी १० वाजता कंपनीचे बांदा येथे कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. यासंबधीत पत्रकार परिषदेत सावंत यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. सावंतवाडी-दोडामार्ग फळबागायतदार संघ यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग बंक,भगिरथ प्रतिष्ठान आणी स्नेह सिंधु यांच्या सहकार्याने कंपनीला ४ जानेवारी २०२२ रोजी रजिस्ट्रेशन मिळाले. कंपनीच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन कंपनी कडून करण्यात आले. कंपनीची शेअर्स रक्कम २ हजार रूपये आणि प्रवेश फी शंभर, सभासद मर्यादा ३०० आहे. पैकी सावंतवाडी-दोडामार्गसाठी २००सभासद आणि इतर सर्व तालुक्यांसाठी १०० सभासद आहे. शेतकरी अर्थात शेअर्स होल्डर यांच्याशी प्रमुख मान्यवर मार्गर्शन करणार आहेत. कंपनीची उद्दीष्टे व पुढील वाटचालीची रुपरेषा व दिशा याबाबत मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडयुसर कंपनी आणि सावंतवाडी-दोडामार्ग शेतकरी फळबागायतदात संघाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत संचालक दिवाकर मावळणकर,प्रकाश वालावलकर,चंद्रशेखर देसाई,सावंतवाडी-दोडामार्ग शेतकरी फळबागायतदात संघ प्रतिनिधी सुरेश गावडे, शेतकरी सभासद हनुमंत देसाई,नारायण आसोलकर,लक्ष्मण गावडे आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)