ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
असलदेत 'चेअरमन आपल्या दारी' उपक्रमाचा १३ फेब्रुवारीला शुभारंभ…!

असलदेत 'चेअरमन आपल्या दारी' उपक्रमाचा १३ फेब्रुवारीला शुभारंभ…!

प्रकाशन: 12 Feb 2022 07:56 PM
वाचन संख्या 46

बँक अध्यक्ष मनीष दळवी,तहसीलदार आर.जे.पवार यांची उपस्थिती..

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी असलदे नूतन कार्यकारी संचालक मंडळ थेट सभासद, नागरिकांच्या संपर्कात जाणार आहे.चेअरमन भगवान लोके यांच्या संकल्पनेतून ‘चेअरमन आपल्या दारी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ बँक अध्यक्ष मनीष दळवी,तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी चेअरमन प्रकाश परब,सरपंच पंढरी वायगणकर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे,पोलीस पाटील श्रीमती पाताडे व गावातील सर्व मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी,संस्थेचे आजी माजी संचालक व शेतकरी सभासद आदी उपस्थित राहणार आहेत.
असलदे या गावातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थर उंचावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.शेतकरी सभासदाना संस्थेच्या विविध कर्ज योजना, नव्याने सभासद नोंदणी,सभासदांना आपल्या संस्थेकडे असलेल्या शेअर्सची माहिती याबद्दलची स्वतः संचालक मंडळ संवाद साधणार आहे.असलदे ग्रामपंचायत सभागृहात शुभारंभ कार्यक्रम होईल,तरी गावातील नागरिकांनी,संस्था सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन चेअरमन भगवान लोके, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स