ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
प्राथमिक शिक्षक भारती करणार १४ फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन..!

प्राथमिक शिक्षक भारती करणार १४ फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन..!

प्रकाशन: 09 Feb 2022 05:22 PM
वाचन संख्या 62

आंतरजिल्हा बदलीसह शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : वर्षभर आंतरजिल्हा बदली पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करावे या प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत.भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही . शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे . तसेच ३ डिसेंबर २०२१ रोजी शिक्षक भारतीच्या वतीने झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने मा.जिल्हा परिषद अध्यक्ष व मा . शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेतील आश्वासनाची कार्यवाही अद्याप झालेली नाही व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात आहेत अशी संघटनेची धारणा झालेली असून याबाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तरी शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने १४ फेब्रुवारी२०२२ पासून कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते ६ असे मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांनी दिली आहे.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न पुढीलप्रमाणे
१)आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमाक ५ मध्ये सिंधुदुर्गचा समावेश होण्यासाठी १० % च्या अटीतील त्रुटी दूर करून समावेश होण्यासाठीची कार्यवाहीबाबत
२) आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करणे
३) ३ डिसेंबर २०२१ च्या आंदोलनातील प्रलंबित प्रश्न
जिल्ह्यातील सर्व शिक्षकानी या लढ्यात मोठ्या संख्येन सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स