ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आज सौ.ज्योती तोरसकर-बुवा यांचे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आज सौ.ज्योती तोरसकर-बुवा यांचे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र.

प्रकाशन: 02 Feb 2022 08:33 AM
वाचन संख्या 191

सायंकाळी ०८.०० वाजता गराजलो रे गराजलोच्या फेसबुक पेजवरुन मुलाखतीचे थेट प्रक्षेपण.

मालवण | नझ़िरा शेख : श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था निर्मित ‘गराजलो रे गराजलो’ या नाटकाद्वारे समाजात व खासकरुन कोकण भूमीपुत्र व कन्यांसाठी  जनजागृतीपर उपक्रम सुरु असतात. आपल्या माणसांनी, आपल्या माणसांसाठी सुरू केलेली ही चळवळ अशीच या चळवळीची सामाजिक ओळख आहे.
श्री.सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष  व सर्वेसर्वा श्री. सहदेव धर्णे यांच्या संकल्पनेतून ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु आहेत आणि या चळवळीचाच एक भाग म्हणजेच लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र हा उपक्रम  प्रकल्प.


या उपक्रमाअंतर्गत आज बुधवार दिनांक ०२फेब्रुवारी२०२२ ला रात्री ठीक ०८ :०० वाजता मालवणच्या सुप्रसिद्ध अशा अ.शि.दे.टोपिवाला हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ.ज्योती रविकिरण तोरसकर- बुवा यांची थेट मुलाखत आयोजित केली आहे.
लेखिका,सुत्रसंचलिका अशी ख्याती असणार्या सौ.ज्योती तोरसकर बुवा यांनी नुकतेच मराठी आणि इतिहास या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होत यशाचा दुर्मिळ योग साधलेला आहे.
टीम गराजलो रे गराजलोतर्फे युवा तरिही अनुभवी मुलाखतकारा कु.बिंदिया मोहिते या सौ.ज्योती तोरसकर बुवा यांची मुलाखत घेणार आहेत.
जास्तीत जास्त विद्यार्थी,कोकणी बांधव यांनी या मुलाखतीला गराजलो रे गराजलोच्या फेसबुक पेजवर अनुभवून बोध घ्यावा,ज्ञान जागरुक व्हावे असे आवाहन श्री.सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष श्री. सहदेव धर्णे यांनी तमाम कोकणी व मराठी जनतेला केले आहे.
खालील लिंकवर क्लिक करुन ही मुलाखत पाहता येऊ शकणार आहे.

Facebook page:https://www.facebook.com/गराजलो-रे-गराजलो-102117271370970/

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स