ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांचे आवाहन…!

पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांचे आवाहन…!

प्रकाशन: 21 Jan 2022 10:15 AM
वाचन संख्या 76

राष्ट्रीय पर्यटनदिनानिमित्त केले पर्यटन महासंघाच्यावतीने व्यावसायिकांना आवाहन..

चिंदर | विवेक परब : पर्यटन संचानालय (DOT),कोकण विभाग.नवी मुंबई महाराष्ट्र राज्य व पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग तर्फे राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त २५/०१/२०२२ रोजी सकाळी ११.३० वा हॉटेल चिवला बीच येथे जलक्रीडा व साहसीक्रीडा व्यावसायिकांसाठी व्यवसाय नोंदणी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या क्षेत्रातील जिल्ह्यातील व्यवसायिकांनी यांचा लाभ घ्यावा तसेच नवीन जेटस्की,बनाना,बंपर,स्पीड बोट,वॉटरस्कूटर ,पॅरॅसिलिंग तसेच स्कुबा डायव्हिंग या जल पर्यटन क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील अन्य साहसीक्रीडा प्रकारातील व्यावसायिकांना आपला चालू किंवा नवीन व्यवसाय नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी तसेच व्यवसाय अधिकृत नोंदणीकृत नसल्याने वारंवार शासनाच्या दंडास व कार्यवाहीस सामोरे जावे लागत आहे पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने या विषयी मार्ग काढण्याचे ठरविले असून सदर व्यवसायातील व्यावसायिकांना या व्यवसाय नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र व व्यवसाय नोंदणी साठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे यासाठी उपसंचालक श्री हनुमंत हेडे कोकण विभाग प्रमुख व श्री प्रशांत वाणी उपअभियंता पर्यटन संचानालय नवी मुंबई कोकण विभाग हे मार्गदर्शन करणार आहेत.
जलपर्यटन व साहसीक्रीडा प्रकारातील जिल्ह्यातील व्यावसायिकानी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा व आपला व्यवसाय नोंदणी प्रकिया पूर्ण करून घ्यावी अशी विनंती श्री विष्णू मोंडकर जिल्हाध्यक्ष,पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स