ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रूबल अगरवाल यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा.

कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रूबल अगरवाल यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा.

कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रूबल अगरवाल यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा.

Article image

मतदान केंद्रांची पाहणी तसेच मतदार नोंदणी अधिकारी कामकाजाचा आढावा घेणार.


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल या दि. ३ व ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाचाही सविस्तर आढावा घेण्यात येणार आहेत.


दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरील उपलब्ध सुविधा, मतदार यादी पुनरीक्षणाशी संबंधित कामकाज तसेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी घेण्यात येणार आहे.


त्यानंतर कणकवली येथील प्रांताधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. दुपारनंतर कुडाळ तहसीलदार कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच, सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भातील सूचना, अडचणी तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे म्हणणे यावेळी जाणून घेतले जाणार आहे. यानंतर कुडाळ येथील नगर पंचायत तसेच मतदान केंद्रालाही भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करण्यात येणार आहे.


दि. ४ सप्टेंबर रोजी सावंतवाडी मतदार संघातील वेंगुर्ला तालुक्यातील मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी करतील . या भेटीदरम्यान मतदान केंद्रावरील सुविधा आणि मतदार यादी पुनरीक्षणाशी संबंधित प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेण्यात येणार आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 209
सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587

लोकप्रिय टॅग्स