ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

मालवण तालुका पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 01 Jan 2026 01:02 PM
वाचन संख्या 249


आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मसुरे येथे पुरस्कार वितरण सोहळा.

Article image



मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका पत्रकार समितीचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता, मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल सभागृह येथे सर्व पुरस्कारांचे वितरण होणार आहे. मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम यांनी याबाबत माहिती दिली.

Article image

प्रशांत हिंदळेकर ( बेस्ट स्टोरी अवॉर्ड, मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत)

Article image

सुधीर पडेलकर ( (स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार)

Article image

श्रीगणेश गांवकर ( स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार)


या सत्कार सोहळ्याला, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई कमिटी अध्यक्ष डॉ. दीपक (मुळीक) परब, मसुरे एज्युकेशन सोसायटी लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सचिव बाळ खडपकर, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, सचिव कृष्णा ढोलम, यासह मालवण तालुका पत्रकार समितीचे पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मिळत आहे. 

Article image

सौ. ज्योती तोरसकर ( मालवणरत्न पुरस्कार मानकरी.)


मालवण पत्रकार समितीच्या वतीने वार्षिक पुरस्कारांमध्ये, श्रीगणेश गांवकर (स्व. नरेंद्र परब स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार), सुधीर पडेलकर (स्व. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार) प्रशांत हिंदळेकर (बेस्ट स्टोरी अवॉर्ड, मालवण पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत) डॉ. ज्योती रविकिरण तोरसकर (मालवण रत्न पुरस्कार) श्री निलेश गवंडी (कला रत्न पुरस्कार) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होणार आहे. 

Article image

निलेश गवंडी ( कलारत्न पुरस्कार मानकरी )


पत्रकार समितीच्या वतीने आयोजित, पत्रकार समिती सदस्यांसाठी गणेश सजावट स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली होती. यातील विजेते नितीन गावडे (प्रथम क्रमांक), भूषण मेतर (द्वितीय), प्रफुल्ल देसाई (तृतीय), केशव भोगले (उत्तेजनार्थ प्रथम), मनोज चव्हाण उत्तेजनार्थ द्वितीय), अर्जुन बापर्डेकर (उत्तेजनार्थ प्रथम) यांचा सन्मान होणार आहे. 


पत्रकार समितीतील काही सदस्य तसेच काही सदस्य कुटुंबियांनी गतवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केले. तालुका स्तरापासून अगदी जिल्हास्तरापर्यत सन्मान प्राप्त झाले. यात महेश सरनाईक, संतोष गावडे, शुभांगी खोत, प्राजक्ता पेडणेकर यांचा समावेश असून त्यांचा विशेष सत्कार यावेळी होणार आहे. 


मुख्य सत्कार सोहळा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी सकाळी ९. ३० ते १०. ३० या वेळेत परिसरातील प्रशालेतील मुलांचे ग्रुप डान्स तसेच दयानंद पेडणेकर यांचे कराओके गायन आदी कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.




(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.

कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...

11 Aug 2026 282

लोकप्रिय टॅग्स