ताज्या बातम्या
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार. निळेली पशुपैदास केंद्र क्षेत्रातील ग्रामस्थांचा १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा.
जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश.

प्रकाशन: 23 Dec 2025 10:30 PM
वाचन संख्या 86

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश.

Article image


सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी २२ डिसेंबर रोजी घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत राज्यस्तरीय योजना तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.  

Article image

या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५ - २५ व २०२५ - २६ या कालावधीतील योजनानिहाय व कामनिहाय स्थिती तपासण्यात आली. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आलेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया, कार्यारंभ आदेश तसेच प्रत्यक्ष कामांची सद्यस्थिती याबाबत संबंधित यंत्रणांकडून अहवाल मागविण्यात आले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या. तसेच ज्या कामांची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, ती तात्काळ पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना देण्यात आले.


सन २०२४ -२५ अंतर्गत दायित्व निधीची मागणी तात्काळ सादर करण्याचे आदेश देताना, आगामी काळातील जिल्हा परिषद आचारसंहिता लक्षात घेऊन प्रशासकीय मान्यता वेळेत पूर्ण होतील, निधी अखर्चित अथवा समर्पित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधांसाठी युनिक आयडी तयार करण्याचे शासनाचे निर्देश असून, त्यानुसार MHUID पोर्टलवर युनिक आयडी निर्मितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधांचे युनिक आयडी तयार करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले.


 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स