कोळीगीतांच्या संस्कृतीचे आंतरराष्ट्रीय आयकाॅन व्यक्तिमत्व मुंबईत गौरवले जाणार..!
मालवण | सुयोग पंडित : महाराष्ट्राच्या कोळीगीत व नृत्य संस्कृतीला सातासमुद्रापार रशिया,फ्रांस,बहरीन,दुबई अशा विविध देशांत अभिमानाने पोहोचवणारे अरुण पेदे वेसावकर यांचा ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट महाराष्ट्रच्या वतीने गौरव होणार असल्याची घोषणा असोसिएशनद्वारा केली गेली आहे.
श्री.अरुण पेदे वेसावकर यांनी त्यांचा संगीत क्षेत्रामध्ये गेली चाळीसपेक्षा जास्त वर्षे देऊन एक अमूल्य योगदान देत रसिकांची त्यांच्या कलेच्या माध्यमातून सेवा केली व सोबतच महाराष्ट्राची संस्कृती जपली.

त्यामुळे ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबईच्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचा ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट महाराष्ट्र यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.
मुंबईत परेल येथील भावसार सभागृह,महाजन वाडी इथे हा सत्कार केला जाईल.
ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र ,मुंबईचे अध्यक्ष श्री सुभाष जाधव,सेक्रेटरी श्री महेश प्रसाद लिमये ,खजिनदार श्री संतोष पांचाळ आदी पदाधिकार्यांनी अधिकृत पत्राद्वारा श्री अरुण पेदे वेसावकर यांना या जाहीर सत्काराचे निमंत्रण पाठवले आहे.
या सत्काराने लोककलावंताचा त्याच्याच मातीत होणारा सन्मान हा सर्वोच्च असल्याची प्रतिक्रिया श्री अरुण पेदे वेसावकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.