30 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

खासदार श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती.

मालवण | ब्यूरो न्यूज : माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस १० एप्रिल रोजी एक ‘आनंद सोहळा तथा उत्सव’ म्हणून साजरा करण्यात येईल अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली. यादरम्यान विविध गाव तसेच विभागात सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. श्री. नारायण राणे व कुटुंबियांचे ग्रामदैवत असलेल्या कांदळगाव येथे १० एप्रिल रोजी लघुरुद्र आणि महाप्रसाद होणार आहे असे श्री. सामंत यांनी सांगितले.

कुंभारमाठ ( मालवण ) येथील निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्री. सामंत यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विविध विकासकामे केली आहेत. साल १९९० पासून आमदार, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री अशा त्यांच्या कारकिर्दीतील अनेक लोकोपयोगी विकासकामांचा उल्लेख करताना खासदार नारायण राणे हे ‘प्रेरणास्थान’ आहेत असे श्री. सामंत यांनी सांगितले. राणे कुटुंब हे एक खासदार व दोन आमदार असे एकमेव कुटुंब असून १९९० साली आमदार झाल्यापासून श्री. नारायण राणे हे मालवण तालुक्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहीले असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा हा त्यांच्यामुळेच पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत झाल्याचेही ते म्हणाले.

खासदार नारायण राणे हे ‘विकासाचे महामेरु’ असून त्यांचा हा वाढदिवस ‘न भूतो न भविष्यति’ होईल असेही श्री. दत्ता सामंत यांनी विशेष नमूद केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह उपजिल्हाप्रमुख राजा गांवकर, दिपक पाटकर, सुदेश आचरेकर, संतोष साटविलकर, मंदार लुडबे, राजू बिडये, भाऊ मोरजे, दादा नाईक, कमलेश कोचरेकर, आनंद खवणेकर, शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी, पदाधिकारी उपस्थित होते.

सौजन्य : मालवण ब्यूरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची माहिती.

मालवण | ब्यूरो न्यूज : माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस १० एप्रिल रोजी एक 'आनंद सोहळा तथा उत्सव' म्हणून साजरा करण्यात येईल अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली. यादरम्यान विविध गाव तसेच विभागात सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. श्री. नारायण राणे व कुटुंबियांचे ग्रामदैवत असलेल्या कांदळगाव येथे १० एप्रिल रोजी लघुरुद्र आणि महाप्रसाद होणार आहे असे श्री. सामंत यांनी सांगितले.

कुंभारमाठ ( मालवण ) येथील निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्री. सामंत यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विविध विकासकामे केली आहेत. साल १९९० पासून आमदार, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री अशा त्यांच्या कारकिर्दीतील अनेक लोकोपयोगी विकासकामांचा उल्लेख करताना खासदार नारायण राणे हे 'प्रेरणास्थान' आहेत असे श्री. सामंत यांनी सांगितले. राणे कुटुंब हे एक खासदार व दोन आमदार असे एकमेव कुटुंब असून १९९० साली आमदार झाल्यापासून श्री. नारायण राणे हे मालवण तालुक्यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहीले असल्याचे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा हा त्यांच्यामुळेच पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत झाल्याचेही ते म्हणाले.

खासदार नारायण राणे हे 'विकासाचे महामेरु' असून त्यांचा हा वाढदिवस 'न भूतो न भविष्यति' होईल असेही श्री. दत्ता सामंत यांनी विशेष नमूद केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह उपजिल्हाप्रमुख राजा गांवकर, दिपक पाटकर, सुदेश आचरेकर, संतोष साटविलकर, मंदार लुडबे, राजू बिडये, भाऊ मोरजे, दादा नाईक, कमलेश कोचरेकर, आनंद खवणेकर, शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी, पदाधिकारी उपस्थित होते.

सौजन्य : मालवण ब्यूरो

error: Content is protected !!