मसुरे | प्रतिनिधी : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोईळ येथील कु. स्वराज धोंडी कदम याने भरीव यश संपादित करून नवोदय विद्यालयासाठी प्रवेश मिळवला आहे.

त्याला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मुख्याध्यापक सौ. वर्षाराणी सुरवसे आणि श्री. गणेश सुरवसे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल बांदिवडे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. निलेश साटम यांनी स्वराज कदम याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.