सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा मालवणच्या अध्यक्ष सौ. शिल्पा यतीन खोत यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. बाँम्बे ब्लडगृप विषयी कार्य करणारी ‘बाॅम्बे ब्लडगृप ऑर्गनायझर’ या संस्थेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. सौ. शिल्पा खोत यांनी रक्तदान, देहदान, अवयवदान व रुग्णमित्र म्हणून संस्थेच्या उद्देशांशी निगडीत दिलेले योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.

सौ. शिल्पा खोत
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर तसेच पदाधिकारी व सदस्य यांनी सौ. शिल्पा खोत यांचे अभिनंदन केले.