मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची तळाशीलवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा ४४ वा वर्धापन दिन सोहळा १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त १२ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वा. अभिषेक सोहळा, सकाळी ७ वा. महापूजा, आरती व तिर्थप्रसाद, ९ वा. हरिनाम दिंडी, संध्याकाळी ५ वा. महेश धामापूरकर यांचे कीर्तन, रात्री ८ वा. ग्रामस्थांचे भजन, रात्री १० वा. मान्यवरांचा सत्कार सोहळा, रात्री ११ वा. तुका म्हणे आता हे संगीत पौराणिक नाटक सादर होणार आहे. १३ रोजी सकाळी ११ वा. सत्यनारायण महापूजा, दु. १२ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. शालेय मुलांचा गुणगौरव सोहळा, रात्री ११ वा. बॅरिस्टर हे सामाजिक नाटक सादर होणार आहे. १४ रोजी दुपारी १२ वा. महाप्रसाद, दु. ३ वा. फनी गेम्स स्पर्धा, रात्री १० वा. ‘वेगळं व्हायचंय मला’ हे सामाजिक नाटक सादर होणार आहे.१५ रोजी रात्री १० वा. सुपर डान्सर डबल धमाका ही दुहेरी नृत्य स्पर्धा होणार आहे. तर १६ रोजी रात्री १० वा. ‘चेडवाची वरात जावयाच्या घरात’ हे विनोदी नाटक सादर होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.