बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेगवे येथील नवसाला पावणाऱ्या व हाकेला धावणाऱ्या,४८ खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “श्री महालक्ष्मी स्थापेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी धार्मिक व भक्तीमय वातावरणात उत्साहात सपन्न झाला. दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
सकाळी पासून धार्मिक कार्यक्रम,दुग्धाभिषेक,मानकरी,देवस्थान समितीचे पदाधिकारी,गावरहाटीचे विविध धार्मिक कार्यक्रम ,सकाळी ब्राह्मणांच्या हस्ते,गावगार्हाणे ,देवतांची पालखी मंदिरात आणण्यात आली. त्यानंतर नवस करणे,फेडणे,ओटी भरणे नारळ,केळी,साखर ठेवणे असे विविध कार्यक्रम सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते.
त्यानंतर रात्री भजन, महाआरती,व मंदिरा भोवती पालखी काढण्यात आली.
या जत्रोत्सवाला मुंबई,पुणे,रत्नागिरी,बेळगांव,कर्नाटक,गोवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांनी उपस्थीत राहून देवतांचे दर्शन घेतले.
सर्व भाविक करोनाचे नियम पाळून व मास्क वापरून करत दर्शन घेताना दिसत होते. यंदा भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
सर्व ग्रामस्थांनी व स्थानिक भाविकांनी जत्रोत्सवाला येणार्या सर्व भाविकांचे देवस्थान कमिटीच्या मार्गदर्शनाने योग्य नियोजन केले होते.