राजापूरातील रिफायनरीचा प्रकल्प शेवरे गावी होणार ;ठाकरे सरकारने केंद्राला दिले पत्र..
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग हाच रेल्वेमार्ग विजयदुर्ग बंदराला जोडला जाईल. मोदी सरकार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २०२४ पूर्वी हे प्रकल्प चालू करतील. राजापूर तालुक्यातील बारसु शेवरे येथे रिफायनरी प्रकल्प होत आहे.त्याचे अंतर नाणार येथून २५ किलोमीटर आहे.राजापूरातील रिफायनरीचा प्रकल्प शेवरे गावी होणार आहे.ठाकरे सरकारने केंद्राला पत्र दिले आहे. राज्यात अनेक समस्या आहेत,त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्क फ्रॉम होम या मानसिकतेतून बाहेर पडावे असा टोला माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी उपसभापती मिलींद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सरचिटणीस राजू शेट्ये,नगरसेवक शिशिर परुळेकर, कार्यालय प्रमुख समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. केंद्राने मुंबई ही आर्थिक राजधानी व पर्यटन राजधानी गोवा जोडण्याचे काम केले.आनंदवाडी बंदर हे देखील मार्गी लावले आहे.मोदी सरकार व गडकरी यांच्या माध्यमातून कामे होत आहेत.कोल्हापूर व वैभववाडी आणि विजयदुर्ग बंदराला ही रेल्वे जोडण्याचे काम केलं जाईल.१२ पोर्ट विकसित केले जाणार आहे. राज्य सरकारला बारसु गोवळ रिफायनरी करायला हरकत नाही असे पत्र राज्य सरकारने दिलं आहे व ते देण्यास आम्ही भाग पाडले आहे.फडणवीस व आम्ही लवकरच मंत्र्यांची भेट घेणार आहोत.रिफायनरी प्रकल्प व रेल्वे मार्ग हा भाजपच्या अजेंड्यावर आहेत.संपूर्ण हिंदुस्थानात ४०० नव्या गाड्या केंद्र सरकार देत आहे.ठाकरे सरकार मात्र विकासाचा कार्यक्रम कमी आणि राणेंच्या पाठीमागे जास्त लागले आहेत.माजी पालकमंत्री केसरकर सांगत होते,”मी असतो तर काय केलं असतं ?” जिल्हा बाहेरील उदय सामंत यांना पालकमंत्रीपद दिल्याने त्यांना राग आहे.त्याची अस्वस्थता आहे,त्यामुळे ते पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात कुरघोडी करतात . आम.वैभव नाईक,केसरकर यांना डावलत रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री केला गेला आहे. राज्यात पहिला मुख्यमंत्री असा आहे,तो बाहेर पडत नाही.रोजगार गेले,लोक मृत्युमुखी पडलेले आहे,अशा संकटात सेनापती आहेत कुठे? हा प्रश्न राज्यातील जनता विचारत आहेत.सगळे पीडित आहेत, नाडीत आहेत.सगळ्या मोठ्या घोषणा केल्या त्या कुठे राहिल्या? आजही आपण विनंती करतो,”मुख्यमंत्री साहेब बाहेर पडा.नाहीतर सरकारमधून सन्मानाने बाहेर पडा “अशी मागणी प्रमोद जठार यांनी केली. नाहीतर २०२४ मध्ये आपोआप सरकार फेकले जाईल,असा इशारा श्री .जठार यांनी दिला. देवेंद्र फडणवीस गोव्यात काम करत आहेत. माझ्याकडे वास्को विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आहे.गोव्यात प्रमोद सावंत हॅटट्रिक करतील असा विश्वास जठार यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी भाजप व जनतेच्या वतीने आज भारतरत्न लतादीदींना भाजपच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. जगप्रसिद्ध गायिका लतादीदी यांचे निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे .लतादिदींना अनेक उपाधी मिळाल्या.गानकोकीळा भारतरत्न मिळला,त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी,अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली.