सूरसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर कालवश…!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सूर सरस्वती ‘आनंदघन’ भारतरत्न व गायन सम्राज्ञी लता मंगेशकर यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून अत्यवस्थ होती. शनिवार दिनांक पाच फेब्रुवारी पासून त्यांची तब्बेत बिघडल्याने अवघ्या भारताचे लक्ष मुंबईतील ब्रीच कॅंडी हाॅस्पिटलकडून येणार्या माहितीकडे लागले होते.
आज सकाळी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे अशी अधिकृत घोषणा इस्पितळाच्या माहिती प्रवक्त्याने दिली. लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती आणि जवळपास गेले महिनाभर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच लता मंगेशकर यांनी कोरोनाला मात दिल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच त्यांना आय सी यु मधून बाहेर आणल्याचे देखील समजले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांची तब्बेत अचानक बिघडली होती. अखेर त्यांची जीवनज्योत मालवली.
‘आनंदघन’ लतादिदींच्या देहाने जाण्याने कला,सांस्कृतिक आणि समस्त सामाजिक भारतवर्षाचाच कंठ दाटून आला आहे .
त्यांच्या निधनाने संपूर्ण जगातून शोक व्यक्त होत आहे.