कट्टा / प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील रहिवासी मालवण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे अंतर्गत उपकेंद्र मसदे येथे कार्यरत असलेल्या आरोग्य सेविका संजीवनी सहदेव सावंत वय ५५ यांचे दिर्घ आजाराने उपचार सुरू असताना कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, २ मुलगे, सुना, नातवंडे, वडील, भाऊ, बहीण,भावजया, दीर, नणंद, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.
वनविभागाचे निवृत्त कर्मचारी सहदेव सावंत यांच्या त्या पत्नी होत. संजीवनी सावंत यांनी ३३ वर्ष आरोग्य सेवेत उत्तम काम केले. मनमिळावू परोपकारी व सेवाभावी असा त्यांचा स्वभाव होता. मालवण कट्टा याठिकाणी त्यांनी ८ वर्ष आरोग्य सेविका म्हणून उत्तम आरोग्य सेवा केली. यानंतर सध्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे अंतर्गत उपकेंद्र मसदे येथे कार्यरत होत्या. गेले काही महिने त्या दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु अखेर रविवार ८ ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मूळ गावी कुणकेरी येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली होती.