मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर प्रा. लिमिटेड मुंबईच्या डेप्युटी जनरल मॅनेजर सौ. नंदा कुलकर्णी यांच्या वतीने कै. रामचंद्र गोलतकर व कै. सीमाबाई गोलतकर यांच्या स्मरणार्थ वडाचापाट येथील श्री देवी शांतादुर्गा हायस्कुलच्या आयबीटी मधील गृह आरोग्य विभागास दोन शिलाई मशीन भेट देण्यात आल्या.
या शिलाई मशीन वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारी ए. सो. हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. वामन खोत उपस्थित होते. श्री. खोत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शांतादुर्गा हायस्कुलचे मुख्याध्यापक जे. एन. पाटील यांनी वामन खोत व शिक्षक आर. बी. देसाई यांचे स्वागत करत प्रास्ताविक केले. आयबीटीच्या शिक्षिका पाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात वामन खोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिक्षक श्री. कुबल यांनी केले. तर आभार सौ. दळवी यांनी मानले.