30.3 C
Mālvan
Tuesday, May 6, 2025
IMG-20250501-WA0008
IMG-20240531-WA0007

वैभव सूर्यवंशीच्या वादळी शतकासह राजस्थान राॅयल्स विजयी.

- Advertisement -
- Advertisement -

आयपिएल इतिहासातील सर्वात युवा क्रिकेटपटूने रचले अनेक विक्रम.

मालवणचे ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू महेश कांदळगांवकर यांची ‘क्रिकेटिंग भविष्यवाणी’ खरी ठरली.

ब्यूरो न्यूज | क्रीडा : आयपीएलच्या आजवरचा सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं आपल्या तिसऱ्याच सामन्यात नवा इतिहास रचला. जयपूरच्या मैदानात गुजरातविरुद्धच्या सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी करत वैभव सूर्यवंशीनं अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकलं. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय. तर आयपीएलमधलं हे दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं. त्याच्या या शतकी खेळीत ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. याआधी बंगलुरुकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलनं पुणे वॉरियर्सविरुद्ध ३० चेंडूत शतक ठोकलं होतं.

१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने त्याच्या तिसऱ्या आयपीएल सामन्यात इतिहास रचला आहे. वैभवने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, त्याच पद्धतीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी केली. आधी वैभवने १७ चेंडूत ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने आपले पहिले अर्धशतक ठोकले. हे या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे.

त्यानंतर त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०` धावांची खेळी केली. वैभव सूर्यवंशीने २६५.७८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्यामध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान, त्याने शतक पूर्ण करण्यासाठी फक्त ३५ चेंडू घेतले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय फलंदाजही बनला. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता. २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना त्याने हे शतक झळकावले होते. आता १५ वर्षांनंतर, वैभव सूर्यवंशीने त्याला मागे टाकले आहे.

आयपीएलमध्ये शतक ठोकणाऱ्या सर्वात तरुण फलंदाजाचा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता. मनीष पांडेने १९ वर्षे २५३ दिवसांच्या वयात हे केले. पण आता हा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावरही आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. त्याच्या आधी मुरली विजयने २०१० मध्ये एका डावात ११ षटकार मारले होते.

*******************

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या तत्कालीन उच्च महाविद्यालयीन लेदरबाॅल क्रिकेट संघाला, मुंबई विद्यापीठ स्तरावरच्या फेरीत पोचवणारे माजी कप्तान व शैलीदार ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू व फलंदाज महेश कांदळगांवकर यांनी, मालवण भरड नाका येथे, दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी ‘एका अनौपचारिक संवादात’ युवा वैभव सूर्यवंशीच्या दिनांक २० एप्रिलच्या पहिल्या सामन्यातील कामगिरी विषयी बोलताना सांगितले होते, “वैभव सूर्यवंशीची शैली तंत्रशुध्द आहे आणि सध्या त्याच्यावर बिलकुल दडपण नाही. या दोन्ही जमेच्या बाजू असल्याने तो पहिल्याच आयपिएल मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणार. ‘त्याने सेंच्युरी ठोकली तरी त्यात आश्चर्य नाही व तो ती यंदाच ठोकून दाखवेल,’ अशी त्याची प्रतिभा आहे परंतु आत्ताच त्याच्या टेंपरमेंटची चर्चा करण्यापेक्षा त्याचे तंत्र आणि त्याचा खेळ याचा आनंद घेणे व सध्या त्याला दडपणमुक्त ठेवणे महत्वाचे आहे. आगामी काळात त्याला देशासाठी आवश्यक कामगिरीसाठी मार्गदर्शन करणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित मार्गदर्शक प्रशिक्षकांसाठी आवाहन असेल.”

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आयपिएल इतिहासातील सर्वात युवा क्रिकेटपटूने रचले अनेक विक्रम.

मालवणचे ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू महेश कांदळगांवकर यांची 'क्रिकेटिंग भविष्यवाणी' खरी ठरली.

ब्यूरो न्यूज | क्रीडा : आयपीएलच्या आजवरचा सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं आपल्या तिसऱ्याच सामन्यात नवा इतिहास रचला. जयपूरच्या मैदानात गुजरातविरुद्धच्या सामन्यात चौकार षटकारांची आतषबाजी करत वैभव सूर्यवंशीनं अवघ्या ३५ चेंडूत शतक ठोकलं. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय. तर आयपीएलमधलं हे दुसरं सर्वात वेगवान शतक ठरलं. त्याच्या या शतकी खेळीत ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. याआधी बंगलुरुकडून खेळणाऱ्या ख्रिस गेलनं पुणे वॉरियर्सविरुद्ध ३० चेंडूत शतक ठोकलं होतं.

१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने त्याच्या तिसऱ्या आयपीएल सामन्यात इतिहास रचला आहे. वैभवने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती, त्याच पद्धतीने गुजरातविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी केली. आधी वैभवने १७ चेंडूत ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने आपले पहिले अर्धशतक ठोकले. हे या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक देखील आहे.

त्यानंतर त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३८ चेंडूत १०` धावांची खेळी केली. वैभव सूर्यवंशीने २६५.७८ च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या, ज्यामध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान, त्याने शतक पूर्ण करण्यासाठी फक्त ३५ चेंडू घेतले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा भारतीय फलंदाजही बनला. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता. २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना त्याने हे शतक झळकावले होते. आता १५ वर्षांनंतर, वैभव सूर्यवंशीने त्याला मागे टाकले आहे.

आयपीएलमध्ये शतक ठोकणाऱ्या सर्वात तरुण फलंदाजाचा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता. मनीष पांडेने १९ वर्षे २५३ दिवसांच्या वयात हे केले. पण आता हा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावरही आहे. वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या विक्रमाची बरोबरीही केली आहे. त्याच्या आधी मुरली विजयने २०१० मध्ये एका डावात ११ षटकार मारले होते.

*******************

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या तत्कालीन उच्च महाविद्यालयीन लेदरबाॅल क्रिकेट संघाला, मुंबई विद्यापीठ स्तरावरच्या फेरीत पोचवणारे माजी कप्तान व शैलीदार ज्येष्ठ लेदरबाॅल क्रिकेटपटू व फलंदाज महेश कांदळगांवकर यांनी, मालवण भरड नाका येथे, दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी 'एका अनौपचारिक संवादात' युवा वैभव सूर्यवंशीच्या दिनांक २० एप्रिलच्या पहिल्या सामन्यातील कामगिरी विषयी बोलताना सांगितले होते, "वैभव सूर्यवंशीची शैली तंत्रशुध्द आहे आणि सध्या त्याच्यावर बिलकुल दडपण नाही. या दोन्ही जमेच्या बाजू असल्याने तो पहिल्याच आयपिएल मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणार. 'त्याने सेंच्युरी ठोकली तरी त्यात आश्चर्य नाही व तो ती यंदाच ठोकून दाखवेल,' अशी त्याची प्रतिभा आहे परंतु आत्ताच त्याच्या टेंपरमेंटची चर्चा करण्यापेक्षा त्याचे तंत्र आणि त्याचा खेळ याचा आनंद घेणे व सध्या त्याला दडपणमुक्त ठेवणे महत्वाचे आहे. आगामी काळात त्याला देशासाठी आवश्यक कामगिरीसाठी मार्गदर्शन करणे हे त्याच्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित मार्गदर्शक प्रशिक्षकांसाठी आवाहन असेल."

error: Content is protected !!