बांदा | राकेश परब : बांदा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी मयुरेश रमेश पवार याने आतापर्यंत अबॅकच्या राज्यस्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले असून त्याच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे. नुकत्याच सांगली येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याने राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला.
गेल्या पाच वर्षांमध्ये मयुरेशने अबॅकसच्या विविध स्पर्धेत यश मिळवत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे . जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेत शिकत असलेला हा विदयार्थी बांदा येथील एकलव्य अबॅकस अकॅडमीमध्ये अबॅकसचे धडे घेत आहे त्याने अबॅकसच्या स्पर्धेला सिनियर के. जी. पासून सुरुवात केली असून या पाच वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर, इस्लामपूर, पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत तसेच गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल स्पर्धेत आपल्या बक्षीसाची परंपरा कायम राखत आतापर्यंत नऊ बक्षीसे त्याने पटकावली आहेत . या स्पर्धेसाठी बांदा यथील एकलव्य अबॅकस अँकडमीच्या शिक्षिका स्नेहा केसरकर त्याचबरोबर बांदा नं १ केंद्रशाळेतील सर्व शिक्षक वर्ग व मयुरेशचे वडील प्राथमिक शिक्षक रमेश पवार व आई जयश्री पवार यांचे मार्गदर्शन मिळत आहे मयुरेश नियमित सुलेखन करतो तसेच त्याला चित्रकलेची आवड असून विविध स्पर्धात्मक उपक्रमात आवडीने भाग घेत असतो. मयुरेशने मिळवलेल्या या यशाबद्दल बांदा केंद्रशाळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर ,बांदा सरपंच अक्रम खान , मुख्याध्यापक सरोज नाईक ,शिक्षक वर्ग , ग्रामस्थ व सावंतवाडी तालुक्यातील शिक्षक परिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.