25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

२००२ साली नियुक्त शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर होणार!

- Advertisement -
- Advertisement -

शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षक भारतीची सकारात्मक चर्चा

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: २००२ साली नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दुर करण्यासह विविध विषयांवर शिक्षणाधिकारी श्री. मुश्ताक शेख व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा संपन्न झाली.गेली चार वर्षे या बाबत शिक्षक भारतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.या त्रुटी दुर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रायोगिक स्तरावरील प्रस्ताव शिक्षक भारतीच्या वतीने सादर करण्यात आले होते.त्या प्रस्तावांना मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून हा प्रश्न लवकरच निकाली काढू असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले त्यामुळे २००२ साली नियुक्त शिक्षकांच्या ६ व्या वेतन आयोगातील त्रुटी दुर होणार असल्याची माहिती अध्यक्ष संतोष पाताडे यांनी दिली आहे. यावेळी संघटनेच्या वतीने शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे, जिल्हा प्रतिनिधी श्री.मंगेश बागवे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष वसंत गर्कल,कुडाळ तालुकाध्यक्ष योगेश देशमुख,मालवण तालुकाध्यक्ष संतोष कोचरेकर, वेंगुर्ला सचिव तानाजी शिंगाडे, श्री.विनेश जाधव, श्री.सुभाष साबळे श्री. प्रशांत खेडकर उपशिक्षणाधिकारी श्री. शेर्लेकर व कक्ष अधिकारी श्री. दत्ता गायकवाड उपस्थित होते. गेले वर्षभर शाळांना कोणत्याही प्रकारचे अनुदान प्राप्त नसल्याने शाळांची वीजबिले थकीत आहेत. त्यामुळे बहुतांशी शाळांना वीजवितरण कंपनीने वीज जोडणी तोडण्याच्या नोटीसा दिल्या आहेत तर काही शाळांची वीज जोडणी तोडली आहे.म्हणून शाळांना वीजबिल भरण्यासाठी अनुदान त्वरित प्राप्त व्हावे तसेच वीज जोडणी तोडू नये यासाठी वीजवितरण कंपनीला शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत पत्र देवून सूचित करावे अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली. यावर विजबिलासाठी सेस फंडातून अनुदान लगतच्या कालावधीत दिले जाईल व सध्यस्थितीत वीजवितरण कंपनीला वीज जोडणी तोडू नये यासाठी कार्यालय मार्फत पत्र दिले जाईल असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद आहेत परंतू कुडाळ तसेच अन्य काही तालुक्यात जमावबंदी असताना केंद्र व प्रभाग स्तरावर शिक्षकांना एकत्र करून शिक्षकांची प्रशिक्षणे आयोजित केली जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होवून शिक्षक व विद्यार्थी यांच्या जीवितास धोका होवू शकतो त्यामुळे ऑफलाईन प्रशिक्षणे रद्द करण्याची मागणी संघटनेमार्फत करण्यात आली. यावर ऑफलाईन प्रशिक्षणे रद्द करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील,असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.जिल्ह्यात काही ठिकाणी शाळा बंद असताना अभिलेख संधर्भात अनेक अनावश्यक मुद्दे घेवून वार्षिक तपासणी केली जात आहे तसेच केवळ १ महिना शाळा सुरू असताना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापननुसार विविध तंत्र वापरून मूल्यमापन करण्याची सक्ती केली जात आहे याबाबत संपूर्ण जिल्हाभरात वरील विषयांची योग्यप्रकारे अंमलबावणी होण्यासाठी सूचना द्याव्यात अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली. त्यावर गटशिक्षणाधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या जातील असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.NPS योजनेचे फॉर्म भरून तीन चार महिने PRAN नंबर मिळत नसल्याने संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर वित्त विभागाशी चर्चा करून अतिशय कमी वेळात PRAN नंबर दिले जातील असे शिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिले.वेंगुर्ला तसेच अन्य काही तालुक्यात दोन वर्ष झाली तरी वरिष्ठ वेतनश्रेणी फरक मिळाला नाही याकडे शिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले.

यावर शिक्षणाधिकारी यांनी संबधित गटशिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या जातील व कोणत्या ही परिस्थितीत मार्च पर्यंत फरक दिला जाईल असे आश्वासन दिले.माध्यमिककडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या शिक्षकांना नियमित करणे व त्यांचा गटविमा सुरू करणेबाबत वरील शिक्षकांची प्राथमिक कडे तीन वर्षे सेवा पूर्ण झाली असून त्यांना प्राथमिक कडे नियमित करण्याबाबतचे आदेश त्वरित निर्गमित करावे व गटविमा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली. यावर त्यांना नियमित आदेश लवकरात लवकर देण्यात येतील व गटविमा सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.तसेच गेली चार वर्षे शिक्षक भारतीने पाठपुरावा केलेला २००५ पूर्वीच्या शिक्षकांची कपात रक्कम प्रो. फंडात वर्ग करण्याबाबत, दिव्यांग शिक्षकांना उपकरणे मिळण्याबाबत व विज्ञान व गणित शिक्षकांची पदे भरण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावर २००५ पूर्वीच्या शिक्षकांची प्रो. फंडात रक्कम वर्ग करण्याबाबत प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे, दिव्यांग शिक्षकांना उपकरणे देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल व गणित विज्ञान पदे भरण्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.शिक्षक भारती ने सातत्यपूर्ण पाठपुरावा केलेला वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरीचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने तातडीने व अतिशय सकारात्मक कार्यवाही केल्याबद्दल संघटनेने आभार व्यक्त केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!