कणकवली | उमेश परब : श्रावण महिना आज पासून प्रारंभ होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच शंकराच्या मंदिरांमध्ये दरवर्षी प्रमाणे गावकऱ्यांकडून पूजाअर्चा केली जाते.पहिलाच सोमवार असल्याने
भक्तांनी दर्शन घ्यायला सुरु केले आहे.यावेळी कोरोना महामारीपासून सर्वांना मुक्त करण्याचे भक्तांचे गाऱ्हाने होत आहे.कणकवली येथील स्वयंभू मंदिरात भक्तांनी सकाळ पासून दर्शन घ्यायला सुरुवात केली आहे.
कणकवली स्वयंभू मंदिर येथे दरवर्षी भक्तीमय वातावरणात असते. पण यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने व कोरोनाचे सर्व नियम पाळून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भक्तांनी स्वयंभूचे दर्शन घेत अभिषेक केला. यावेळी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी देखील स्वयंभू दर्शन घेऊन अभिषेक केला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्यात स्वयंभू मंदिर मान्यवरांच्या वतीने सकाळी ६ वाजता काकड आरती करण्यात आली. नंतर गणेश पूजन करून भाविकांनी दर्शन घेत दुधाचा अभिषेक केला.
दरवर्षी प्रमाणे दुपारी स्वयंभू मंदिर मध्ये नैवेद्य म्हणून महाप्रसाद दाखवण्यात येतो व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात,पण या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होणार नसल्याचे स्वयंभू मंदिर मानकरी यांनी सांगितले.
यावेळी मानकरी गावपुरुष सदानंद राणे,खोत अनाजी राणे,विलास राणे ,तेजस राणे,विपुल कुलकर्णी,राजू गुरव,संजू करंबेळकर,मनोज राणे ,समीर राणे ,सूर्याजी राणे ,व मानकरी उपस्थित होते.