७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
मालवण | वैभव माणगांवकर : मालवण येथील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी करण्याची आवश्यकता नाही. या स्पर्धेची लिंक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११वाजता सुरू करण्यात येईल आणि ११.१७ला बंद करण्यात येईल. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा एकूण ४० गुणांची असेल. यात एकूण २० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न स्वातंत्र्य दिनावर आधारित असतील. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असे विभाजन केलेलं असेल. व यासाठी १५ मिनिटे वेळ देण्यात येईल.
या लिंकद्वारे जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी केले आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट रोजी सकाळी. ११ वाजता एक लिंक तयार केली त्यावरून ऑनलाईन परीक्षा देता येईल. सहभागी विद्यार्थ्यांमधून पहिले ३ क्रमांक काढले जातील व त्यांना त्यांच्या मेल वर स्वतंत्र प्रमाणपत्रे पाठवण्यात येतील. तसेच स्पर्धेमध्ये पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटो जनरेट अप्रिशियट सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.