आचरा/ विवेक परब : पळसंब बौध्दवाडी येथे करण्यात आलेल्या शेतीच्या संरक्षणासाठी भगीरथ प्रतिष्ठान झारापचे अध्यक्ष श्री. प्रसाद देवधर यांच्याकडून ‘माकडांपासून शेतीचे सरक्षण’ करण्यासाठी शेडनेट ( ग्रिन कापड ) या प्रकल्पाची पहाणी करण्यात आली.सदर शेडनेट मोफत पुरविण्यात आले होते व त्याचा योग्य वापर करून शेती बंदिस्त करत शेतकरी श्री. संतोष परब, बाळा सावंत यानी कुळीथ, चवळी, पालक, मुळा इत्यादी भाजीपाला केला आहे.
श्री. प्रसाद देवधर याचे सरपंच श्री चद्रकांत गोलतकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.