कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारच्या ‘सांस्कृतिक मंत्रालय तर्फ़े तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र नागपुर ‘,यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी अध्यक्ष श्री. परशुराम विश्राम गंगावणे यांच्या कला आंगण मध्ये उद्या दिनांक ८/१/२०२२ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या रांगोळी स्पर्धेसाठी वय वर्षे १० वरील व्यक्ति सहभागी होऊ शकतील.
या रांगोळी स्पर्धेसाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’,हा विषय असुन स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी श्री. चेतन परशुराम गंगावणे मोबाईल नं. 9987653909 या नंबर वर नोंदणी करावयाची आहे.
ही स्पर्धा जिल्हा पातळीवरील असुन केंद्र सरकारच्या वतिने या स्पर्धेचे आयोजन पिंगुळी येथे करण्यात आलेले आहे. सदरची स्पर्धा ऑनलाईन असुन स्पर्धकांना बक्षीस देण्यात येणार आहे.
प्रथम नावे नोंदणी करणा-या व्यक्तींना यावेळी प्राधान्य देण्यात येईल.तसेच या रांगोळी चे प्रदर्शन सायंकाळी ४.०० ते ७.०० पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
अधिक माहितीसाठी संपर्क श्री.चेतन परशुराम गंगावणे ,मोबाईल क्रमांक 9987653909 ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरी
पिंगुळी,इथे संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.