कुंभारमाठ ग्रामपंचायत व ग्लोबल फाऊंडेशन यांचे आयोजन
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कुंभारमाठ ग्रामपंचायत व ग्लोबल फाऊंडेशन पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन कुंभारमाठ येथील अथर्व मंगल कार्यालय येथे करण्यात आले. उद्घाटन गटविकास अधिकारी जे.पी.जाधव यांनी केले.
सदर आरोग्य शिबिरात नेत्र तपासणी ग्लोबल फाऊंडेशनमार्फत डॉ.श्रीनिवास परब, लक्ष्मण देसाई,उमेश गावडे यानी तर जनरल आरोग्य तपासणी होमिओपॅथिक डॉ. अंगराज माने व डॉ.पायल माने यानी केली.
सदर कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कुबेर मिठारी, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर,डॉ.सोमवंशी, डॉ. फोंडेकर, पंचायत समिती सदस्या सौ.मनिषा वराडकर, सरपंच श्री. प्रमोद भोगांवकर, उपसरपंच श्री. मनोज वातेगांवकर, ग्रामसेवक श्री. गणेश नलावडे, सदस्य विनोद भोगांवकर, पंढरीनाथ माने, किशोर पवार, प्रणिता लंगोटे,प्रिया लंगोटे, पूनम सावळे,आचल गावठे, आरोग्यसेवक एल. सी. नातेवाड,पोलीस पाटील श्री. विठ्ठल बावकर आशा सेविका सौ. प्रणिता भोगांवकर व सौ. अश्विनी नेवाळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.सदर कार्यक्रमास कोविड संबंधित सर्व नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन तंटामुक्त समिती अध्यक्ष
मधुकर चव्हाण यांनी केले.