मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: श्री स्वामी समर्थ मठ हडपीड – देवगड येथील मठाचे संस्थापक विश्वस्थ श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी मठाच्या तर्फे बनवीलेल्या श्री स्वामी समर्थ तारक मंत्राच्या कार्डचे प्रकाशन वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समिती अध्यक्ष श्री महेश इंगळे यांच्या हस्ते नुकतेच अक्कलकोट येथे झाले. नेहमी वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या हडपीड स्वामी समर्थ मठाच्या वतीने स्वामी समर्थांचा तारक मंत्र कार्ड अगदी खिशात मावेल अशा पद्धतीने बनविण्याची संकल्पना उत्तम आहे असे यावेळी अध्यक्ष महेश इंगळे म्हणाले.
यावेळी हडपीड मठाचे संस्थापक विश्वस्त नंदकुमार पेडणेकर, गाव समिती सरचिटणीस विनोद आईर,
कोकण कट्टाचे संस्थापक विश्वस्थ अजित चितळे, मधुसूदन भडसाळे, अनंत जंगम आदी उपस्थित होते.