ओरोस / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात आज ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या शंभरी पार पोहचली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज ४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. आज पॉजिटीव्ह आलेल्यांमध्ये देवगड तालुक्यातील ४ , दोडामार्ग ४ , कणकवली ३ , कुडाळ ७ , मालवण १२ , सावंतवाडी ७ , वेंगुर्ला तालुक्यातील २, जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे .
आज ३ रुग्ण कोरोनामुक्त – जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३ हजार ३६१ पॉजिटीव्ह मिळालेल्या रुग्णांपैकी ५१ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या १३४ रुग्ण सक्रिय आहेत. तर आज ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.