कणकवली / उमेश परब – नांदगाव-असलदे प्राथमिक शाळा क्र.4 जवळ उभारण्यात आलेला मोबाईल टॉवर हटविण्याची मागणी 1 जानेवारी 2019 रोजी ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात आली होती. मात्र त्यानंतर वर्षभरात हा मोबाईल टॉवर हटविण्यात आला नाही. येत्या पंधरा दिवसात हा टॉवर हटविण्यात आला नाही तर मुलांना शाळेत न पाठविण्याबरोबरच या अन्यायाविरूध्द उपोषण आंदोलन छेडण्याचा इशारा नांदगाव, असलदेतील पालक व ग्रामस्थांनी दिला आहे. नांदगाव, असलदे प्राथमिक शाळेजवळ उभारण्यात आलेला मोबाईल टॉवर मुलांच्या आरोग्याचा विचार करता हटविण्यात यावा अशी मागणी वर्षभरापूर्वी पालक व ग्रामस्थांनी केली होती. मात्र वर्षभरात हा मोबाईल टॉवर हटविण्याविषयी कोणतीही उपाययोजना संबंधित यंत्रणेकडून करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ व पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हा मोबाईल टॉवर न हटविल्यास मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे, तसे निवेदन पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकार्यांना दिले आहेत. मोबाईल टॉवर येत्या पंधरा दिवसात हटविण्यात आला नाही तर उपोषण आंदोलन करण्यात येईल. त्याचबरोबर शाळेत मुले न पाठविल्याने त्यांच्या होणार्या शैक्षणिक नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील, असा इशारा नांदगाव, असलदे येथील पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -