मसुरे | प्रतिनिधी : जिज्ञासा फाउंडेशन मालवण यांच्यामार्फत मालवण तालुक्यातील पूरग्रस्त हडी- पाणखोल जुवा बेटावरील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. सदर संस्थेतील कार्यकतें हे कॉलेज मध्ये शिक्षण घेणारे युवक असून त्यांनी त्यांच्या दैनंदिन खर्चातील रकमेतून मदतीचा हात दिला आहे. यावेळी जिज्ञासा फाउंडेशनचे रजत दळवी, प्रतिक कुबल, आदित्य तांबे, श्रेयस हिंदळेकर, वैभव आजगांवकर, चेतन जाधव, आणि सुदर्शन कांबळे यांच्या सह विठ्ठल गोलतकर, राजेंद्र शेट्ये, प्रवीण मुणगेकर, संजय मिठबांवकर, गुरुनाथ मिठबांवकर, नामदेव खोत आणि रोहित मिठबांवकर उपस्थित होते. सर्व गावकऱ्यांच्यावतीने जिज्ञासा फाउंडेशन मालवणचे आभार मानण्यात आले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -