बांदा /राकेश परब : रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श पोलीस पाटील सेवारत्न २०२० यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार ऑनलाईन जाहीर झाला आहे.
गावातील सामाजिक, उपक्रम, शासनाच्या विविध लोकोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्याऱ्या परब यांना आतापर्यंत शासनाच्या व सामाजिक संस्थांच्या विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करते. २०२० मध्ये परब याना आदर्श पोलीस पाटील सेवा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. कोरोना महामारीत मुळे पुरस्कार सोहळा विलंब झाल्याचे परब यांनी सागितले.
अभिनंदन.