कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ):काळ कोरोनाचा होता..पालक,मालक वगैरे सगळेच हरलेले होते.सगळी सोंगं आणता येत होती परंतु आर्थिक सोंगं खरंच शक्य नसतात .
“सुजीत जाधव”..एक असं नाव की ज्याने खूप गोरगरिबांनाही न्याय दिलाय .(खोटं वाटतं तर कलमठ गावकर विषयक महावितरणची आपण बातमी वाचू शकताच!)
शाळा पुनश्च चालू झाल्या…पालकांना फीज,दप्तर,पुस्तके वगैरे टेन्शन होतं…आणि या माणसानी कणकवलीत आपल्या दुकानात * गणवेषात चप्पल व शूजवर थेट सूट दिली.
गरजेला जो उभा राहतो तोच सुजीत असतो…बाकी व्यापारीच असतात..
लेखन वैयक्तिक वाटेल…स्वतः मी चॅनेलवर सिंधुदुर्ग ब्युरोचीफ आहे परंतु जबाबदार आहे..
समाजातील चांगल्या व सात्विक गोष्टींचे कौतुक झालेच पाहिजे..म्हणून आम्ही चॅनेल चालवतो(वाद विवाद,भांडणे वगैरेसाठी नाहीच!(
कोणतेही मंडळ अथवा संस्था टिकवायची असेल तर एकोपा फार महत्वाचा असतो आणि हाच एकोपा निर्माण करण्यासाठी सोनगेवाडीत सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्याचा आपला मानस आहे. आणि सोनगेवाडीत असे उपक्रम राबवून आपण तरुणाईला एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना कार्यकर्ते सुजित जाधव यांनी केले.
कै. श्री. अक्षय कांबळे यांच्या स्मरणार्थ ओमनगर ,सोनगेवाडी यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी सुजित जधव बोलत होते. याप्रसंगी कणकवली नगरपंचायत नगरसेवक ऍड. श्री. विराज भोसले, जितू कांबळे, आशिये पोलिस पाटील श्री . खानोलकर, सी. आर्. चव्हाण , मधुकर शिरकर, श्री. अशोक मढव, शिवराम कांबळे, आणि विनोद राठोड, अमेय शिरकर , सिध्देश मडव, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुजित जाधव म्हणाले की आपल्या मित्राची आठवण कायम राहावी म्हणून त्याचे मित्र परिवार गेली 2 वर्षे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहेत. अक्षय हा तरुण सर्वांशी प्रेमाने व सलोखा निर्माण करणारा तरुण होता. त्याच्या आठवणी जपण्याचे काम निरंतर करत असलेल्या या मित्र मंडळींना माझ्या कडून कोणतीही मदत लागली तर आपण नेहमी तत्पर आहोत.
या स्पर्धेला प्रथम बक्षीस 10,000 व दुसरे बक्षीस 7000 आणि आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.