आचरा/विवेक परब : एकता कल्चरल अकादमी (मुंबई) या महाराष्ट्र शासन मान्य संस्थेच्या वतीने 2021-22 चा दया पवार स्मृती साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार रत्नागिरीस्थित जेष्ठ लेखक इक्बाल शर्फ मुकादम यांच जाहिर झाला आहे. असे संस्थेच्या वतीने लेखी कळविण्यात आले आहे. ४ दशकांच्या या साहित्यिक प्रवासात मुकादम यांनी समाज व्यवस्थेवर विपुल लिखाण केले असून त्यांच्या नांवे म्युझिकल एलबम्स , नॉव्हेल्ट्स , लघुकथा, काव्य, प्रिंट मीडिया कॉलमनिस्ट , दिवाळी अंक संपादन, ते थेट आजच्या सोशल मीडियावर ब्लॉगवर म्हणून लिखाण सुरू असून त्यांस अनेकांचा आभासी सहभाग लाभला आहे. मराठी-हिंदी भाषेत त्यांचे प्रकाशित लिखाणास वाचकांनी भरपूर प्रतिसाद दिला असून नुकत्याच जाहीर झालेल्या या पुरस्कारा मुळे ते सर्व वाचक नक्कीच खुश होतील. मुकादम यांच्या लेखणीस यापूर्वी मुंशी प्रेमचंद राष्ट्रीय पुरस्कार तसेंच कैफी आझमी राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारमुळे साहित्य क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -