25.4 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

बांदा येथे योग शिक्षक प्रशिक्षण वर्गाची सांगता

- Advertisement -
- Advertisement -

गोवा पतंजली व बांदा योगवर्गाचा उपक्रम

बांदा /राकेश परब :बांदा येथे गेले एक महिना सुरु असलेल्या योग शिक्षक प्रशिक्षण वर्गाची सांगता झाली. गोवा राज्य पतंजली आणि बांदा दशक्रोशी पतंजली वर्गाच्या वतीने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बांदा व्यापारी भुवन येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालय येथे गेली अनेक वर्षे सातत्याने पहाटेचा योगवर्ग सुरु असून दशक्रोशीत योगाचा मोठा प्रसार होत आहे. या कार्याचा एक महत्वाचा भाग म्हणून प्रशिक्षित योग शिक्षक निर्माण व्हावेत यासाठी या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.जगदिश पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांद्याचे माजी सरपंच मंदार कल्याणकर होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून पतंजली गोवा राज्य भारत स्वाभिमान प्रभारी कमलेश बांदेकर, पतंजली गोवा राज्य युवा भारत प्रभारी गिरिश परुळेकर ,पतंजली गोवा राज्य योग समिती प्रभारी विश्वास कोरगांवकर, किसान सेवा समिती गोवा राज्य प्रभारी तथा सिकेरी गोशाळा अध्यक्ष कमलाकर तारी ,गोवा राज्य पतंजली योग समिती सदस्य विनायक कानोळकर, माजी सैनिक निलेश सावंत, प्रभव बांदेकर, पतंजली सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी महेश भाट, माजी सरपंच प्रियांका नाईक, ग्रा.पं.सदस्य राजेश विरनोडकर,प्रा.लक्ष्मण पावसकर, डॉ.भालचंद्र कोकाटे, डॉ.तुषार कासकर,गीता गर्दे , जिल्हा समिती सदस्य विकास गोवेकर, विद्याधर पाटणकर युवा भारत जिल्हा प्रभारी,भरत गावडे, सोशल मिडिया प्रभारी रावजी परब आदी मान्यवर उपस्थित होते.

कमलेश बांदेकर यांनी यावेळी बांद्यात सुरु असलेल्या योग सराव वर्गाच्या सातत्यपूर्ण कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.डॉ.जगदीश पाटील यांनी सांगितले की आजचे जीवन गतीमान झाल्याने लोकांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.त्यामुळे आजार वाढत आहेत. निरोगी जिवनासाठी नियमित व्यायाम व योग हे अत्यंत गरजेचे आहेत. अध्यक्षिय भाषण मंदार कल्याणकर यांनी सांगितले की सर्व जग आता योगाकडे वळत आहे.योगाचे महत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे.बांदा पतंजली योगवर्गाचा वाढता प्रतिसाद  हा खरोखरच कौतुकास्पद असून या वर्गाला माझे सर्वतोपरी सहकार्य लाभेल.

यावेळी कमलेश बांदेकर,गिरिश परुळेकर , विश्वास कोरगावकर, कमलाकर तारी , संदेश बाराजणकर , कल्पेश मुळगांवकर,संध्या खानोलकर,विशाल गांवस, डॉ.नामदेव चोपडेकर, महेश भाट , लक्ष्मण पावसकर आदिंचा बांदा योग वर्गातर्फे शाल व श्रीफळ सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवर तसेच प्रशिक्षणार्थी यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या आरंभी योगवर्ग सदस्यांनी स्वागतगीत सादर केले. स्वागत सुदन केसरकर, संजय नाईक , सिद्धेश पावसकर, स्नेहा धामापुरकर ,सचिन जोशी , नंदादिप केऴुसकर ,साईनाथ धारगळकर यांनी केले. प्रास्ताविक विकी केरकर , सुत्रसंचालन अरुण सुतार यांनी तर अाभारप्रदर्शन प्रियांका हरमलकर यांनी केले. योगशिक्षक प्रशिक्षण शिबिर  पुर्ण झाले तरी बांदा येथे पतंजलीचा योगवर्ग नियमित सुरु राहणार असून सर्वांनी यात सहभागी होण्याचे आवाहन अनिल मणियाथ यांनी याप्रसंगी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!