किकबाँक्सिंग मध्ये श्रृतीला सुवर्ण पदक
चिंदर /विवेक परब( सहसंपादक): मालवण तालुक्यातील पळसंब गावठण येथील (मुंबईस्थित) रहिवाशी, कु. श्रुती संदिप परब हिने जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय किकबाँक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड समितीने निवड केली.
पुणे येथे २७ डिसेंबर ते ३० डिसें. २०२१ पर्यंत आयोजित ‘वाको इंडिया राष्ट्रीय किकबाक्सिंग’ स्पर्धेत आसाम, मणिपूर, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या कठीण आणि सर्वोत्कृष्ट समजणार्या खेळाच्या स्पर्धेत सिंधुदुर्गाची मान अभिमानाने उंचावणार्या पळसंब गावची सुपर स्टार कन्या व महाराष्ट्र मुंबई येथील कु. श्रुती संदिप परब हिने सुवर्णपदक पटकावले. यामुळे पळसंब गावचे सरपंच चंद्रकांत गोलतकर, जेष्ठ अभिनेते गिरीधर पुजारे यांनी तिचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस श्रुतीला शुभेच्छा दिल्या.