वाढदिनाच्या निमित्त जपले समाजभान
मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील वडाचापाट येथील उद्योजक दया देसाई यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मसुरे गडघेरावाडी येथील एक घर उभे करण्यासाठी प्राथमिक मदत म्हणून तीनशे चिरे दिले. मागील आठवड्यात मुसळधार पावसाने येथील श्रीमती अर्चना अशोक मुळ्ये परब यांच्या राहत्या घराचे छप्पर मोडून मातीच्या भिंती सुद्धा कोसळल्या होत्या. तातडीने घराचे बांधकाम करणे परब याना अशक्य असल्याने याबाबत दया देसाई याना माहिती मिळताच प्राथमिक स्वरूपाची मदत म्हणून त्यांनी भिंत उभारण्यासाठी लागणारे चिरे दिले आहेत. यावेळी त्यांनी अर्चना परब यांच्या कोसळलेल्या घराची पाहणी करत मदतीचे आश्वासन दिले. यावेळी यशवंत हिंदळेकर, हिरबा तोंडवळकर, सतीश मसुरकर, कृष्णा पाटील, मुकेश मुळ्ये परब, जीवन मुणगेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मदती बद्दल परब यांनी आभार मानले.