24.4 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

क्वॉयर बोर्डच्या माध्यमातून कोकणात उद्योग आणण्याचा प्रयत्न – उद्योगमंत्री राणे

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली / उमेश परब – क्वॉयर बोर्डच्या बैठकीचा महाराष्ट्राची निश्चितच फायदा होणारा आहे. काथ्या उद्योगातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यात या माध्यमातून उद्योग कसे आणता येतील यासंदर्भात आजच्या क्वॉयर बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केंद्रिय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी दिली. क्वॉयर बोर्डची २३९ वी बैठक हॉटेल निलम्स कन्ट्रीसाईड येथील सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे, क्वॉयर बोर्डचे चेअरमन कुपूरामन दुरेपांडेय , बोर्डचे संचालक व्ही.व्ही. रामण्णा (आंध्रप्रदेश) पी.एस.पाटील (गोवा, टि.के अरविंदाक्षण पिल्लाई केरळ), एम. गोपाळराव (हैद्राबाद) पी.एस. राजेश (केरळ), एस.मोहन केरळ व्ही. एस. भुषणरेड्डी (आंध्रप्रदेश), एस.टी कृष्णमूर्ती (कर्नाटक), बी.आर जरना कर्नाटक जोगी गावडा (कर्नाटक) श्रीमती शुभी शोभू (केरळ), क्यॉयर बोर्डचे सेक्रेटरी एम.कुमार राजा या बैठकीत उपस्थित होते. केंद्रिय उद्योग मंत्री ना. नारायण राणे म्हणाले कथ्या उद्योगाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा वाव आहे. यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोकणात काय करता येईल यादृष्टीकोनातून आजच्या बैठकीत सखोल अशी चर्चा झाली. कोकणातील या माध्यमातून येणाऱ्या उद्योगांसाठी कोणत्याही स्थितीत निधी कमी पडू देणार नाही. या उद्योगांसाठी सिंधुदुर्गातील जमिन मालकही जमिन द्यायला तयार आहेत. यामुळे सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगारांच्या संधी उपलब्ध करणे हाच आमचा हेतू आहे. या काथ्या उद्योगाच्या माध्यमातून निर्माण होणारे वस्तू स्थानिक बाजारपेठ ते मॉलपर्यंत कशा जातील हाच आमचा प्रयत्न आहे. काथ्या उद्योगाच्या माध्यमातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून जाळे निर्माण केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या क्वॉयर बोर्डच्या बैठकीत कोकणात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून उद्योग उभारणीची चर्चा झाली. यावेळी केंद्रातील वरिष्ठ अधिकारी झोनल संचालक जे.के.शुक्ला, संचालक (प्रभारी) एम.कृष्णा, सिनिअर अकौंट ऑफिसर व्ही.सी. रघुनंदनन सेक्शन ऑफिसर्स श्रीमती सी.एस.शामल, सेल्स ऑफिसर आर. एम.सलीम, पी.एस.सी.बी. सुनिलकुमार, अकौंट मॅनेजर के.व्ही. रेजी, सिंधुदुर्ग सब-श्रीनिवास विलींगू आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली / उमेश परब - क्वॉयर बोर्डच्या बैठकीचा महाराष्ट्राची निश्चितच फायदा होणारा आहे. काथ्या उद्योगातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यात या माध्यमातून उद्योग कसे आणता येतील यासंदर्भात आजच्या क्वॉयर बोर्डाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती केंद्रिय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी दिली. क्वॉयर बोर्डची २३९ वी बैठक हॉटेल निलम्स कन्ट्रीसाईड येथील सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे, क्वॉयर बोर्डचे चेअरमन कुपूरामन दुरेपांडेय , बोर्डचे संचालक व्ही.व्ही. रामण्णा (आंध्रप्रदेश) पी.एस.पाटील (गोवा, टि.के अरविंदाक्षण पिल्लाई केरळ), एम. गोपाळराव (हैद्राबाद) पी.एस. राजेश (केरळ), एस.मोहन केरळ व्ही. एस. भुषणरेड्डी (आंध्रप्रदेश), एस.टी कृष्णमूर्ती (कर्नाटक), बी.आर जरना कर्नाटक जोगी गावडा (कर्नाटक) श्रीमती शुभी शोभू (केरळ), क्यॉयर बोर्डचे सेक्रेटरी एम.कुमार राजा या बैठकीत उपस्थित होते. केंद्रिय उद्योग मंत्री ना. नारायण राणे म्हणाले कथ्या उद्योगाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा वाव आहे. यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोकणात काय करता येईल यादृष्टीकोनातून आजच्या बैठकीत सखोल अशी चर्चा झाली. कोकणातील या माध्यमातून येणाऱ्या उद्योगांसाठी कोणत्याही स्थितीत निधी कमी पडू देणार नाही. या उद्योगांसाठी सिंधुदुर्गातील जमिन मालकही जमिन द्यायला तयार आहेत. यामुळे सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगारांच्या संधी उपलब्ध करणे हाच आमचा हेतू आहे. या काथ्या उद्योगाच्या माध्यमातून निर्माण होणारे वस्तू स्थानिक बाजारपेठ ते मॉलपर्यंत कशा जातील हाच आमचा प्रयत्न आहे. काथ्या उद्योगाच्या माध्यमातून कोकणातील तिन्ही जिल्ह्यात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून जाळे निर्माण केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. या क्वॉयर बोर्डच्या बैठकीत कोकणात काथ्या उद्योगाच्या माध्यमातून उद्योग उभारणीची चर्चा झाली. यावेळी केंद्रातील वरिष्ठ अधिकारी झोनल संचालक जे.के.शुक्ला, संचालक (प्रभारी) एम.कृष्णा, सिनिअर अकौंट ऑफिसर व्ही.सी. रघुनंदनन सेक्शन ऑफिसर्स श्रीमती सी.एस.शामल, सेल्स ऑफिसर आर. एम.सलीम, पी.एस.सी.बी. सुनिलकुमार, अकौंट मॅनेजर के.व्ही. रेजी, सिंधुदुर्ग सब-श्रीनिवास विलींगू आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!