वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील मसुरे कावावाडी येथे श्री. मंगेश पेडणेकर यांना घराच्या परिसरामध्ये मुलांनी होलीबॉल खेळण्याच्या मैदानाच्या सभोवार लावलेल्या जाळ्यामध्ये खवले मांजर अडकल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र रमण पेडणेकर यांचे माध्यमातून वनविभाग कुडाळ तसेच कोकण वाईल्ड लाईफ फोरम, सिंधुदुर्ग यांना कळविले असता बचाव पथकाने त्याची जाळ्यातुन सुखरूप सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकारी मालवण श्री. दळवी यांचेकडून त्याची तपासणी करून खवले मांजरास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत येणार असलेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे यांनी सांगितले. वन्यप्राणी खवले मांजर ही अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून त्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये संरक्षण प्राप्त असून त्यास अनुसूचि १ मध्ये वर्गीकृत केले आहे. त्याची शिकार/तस्करी करणे कायद्याने प्रतिबंधित केले असून त्याचे उल्लंघनाकरिता ७ वर्षे पर्यंतच्या कारावासाची तसेच द्रव्यदंडाचीही तरतूद करण्यात आलेली आहे.मसुरे कावा येथील ग्रामस्थांनी खवले मांजराचा जीव वाचवून वन्यप्राण्यांबाबत असणाऱ्या संवेदनशीलता आणि आत्मीयतचं चांगलं उदाहरण समाजासमोर ठेवलं असलेने वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे यांनी आभार मानले.हे बचाव कार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री शहाजी नारनवर व सहायक वनसंरक्षक सावंतवाडी श्री आय डी जालगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केलेयावेळी वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक कांदळगाव विष्णू नरळे व कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्गचे अनिल गावडे, रमण पेडणेकर, स्थानिक ग्रामस्थ यांनी बचावकार्य यशस्वी केले.