मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मालवण तालुक्यातील मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते दहावी च्या ७५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला, स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. (पहिली ते चौथी) प्रथम क्रमांक तन्वी तेंडोलकर आणि निमिष वाडकर, द्वितीय रिया प्रभुगावकर तृतीय शंकर बागवे , (पाचवी ते सहावी) – प्रथम दिव्या भाटकर, द्वितीय आर्या मुणगेकर, तृतीय गोजिरी मेस्त्री.( सातवी ते आठवी) प्रथम ऐश्वर्य पेडणेकर, द्वितीय नित्या लब्दे, तृतीय प्रणव पाटील. ( नववी ते दहावी) प्रथम विभूती चेंदवणकर, द्वितीय रोहन पालव, तृतीय लॉसन फर्नांडिस आणि ऋतुजा नरे. थोर भारतीय गणिती तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी गणित शिक्षक मुख्याध्यापक श्री देऊलकर यांनी रामानुजन यांच्या संदर्भात माहिती सांगितली . याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक गौतमी प्रभुगावकर, संजना प्रभुगावकर ,पार्वती कोदे सायली म्हाडगुत, रंजनी सावंत, रेश्मा बोरकर, स्वरांजली ठाकूर, गौरव तोंडवळकर ,संतोषी मांजरेकर उपस्थित होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -