रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईकांच्या हस्ते झाले पुरस्कार वितरण
आचरा / विवेक परब : सामाजिक क्षेत्रात निस्वार्थी आणि सेवाभावी व्रूत्तीने कार्य करणाऱ्या चिंदर तेरई च्या स्नुषा सौ हर्षदा अमोल माळगांवकर यांना इमेज इंटरनँशनल आँनलाईन रिसर्च सेंटर या संस्थेचा मानाचा समजला जाणाऱ्या महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्काराने रविवारी कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात आले आहे. झी मराठी वाहीनीवरील रात्रीस खेळ चाले फेम माधव अभ्यंकर यांच्या हस्ते राजश्री शाहू स्मारक कोल्हापूर येथे लोकसंवाद प्रतिमा संमेलनात हर्षदा माळगांवकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ बी एन खरात, प्रकाश गायकवाड , निसार सुतार, अशोक आखाडे,विवेकानंद जितकर , प्रविण अलई ,अमोल माळगांवकर आदी उपस्थित होते.पुरस्कार प्राप्त हर्षदा माळगांवकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या पुरस्काराने चिंदर गावच्या गौरवात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे.