मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून ओळखले जाते . जात, धर्म याच्या पलीकडे जात रक्तदान हे जीवनदायी म्हणून ओळखल जातं. जिल्हा रुग्णालयात दाखल गरोदर महिलेला असलेली रक्ताची गरज पूर्ण करत मालवण येथील रक्तदात्यांनी माणुसकीच दर्शन आपल्या कृतीतून समाजापुढे ठेवले आहे. कणकवली मधील गरोदर असलेल्या एका महिलेला हिमोग्लोबिन कमी असल्याने रक्ताची गरज होती. एक बॅग ओरोस ब्लड बँक मधून मिळत होती . अजून एक ए निगेटिव्ह ब्लड बॅगेची आवश्यकता होती . ओरोस जिल्हा रुग्णालयातून सदर महिलेने ग्लोबल रक्तदाते ग्रुपच्या सदस्यांना संपर्क साधत रक्ताची गरज असल्या बाबत कळविले होते. पूर्ण खात्रीकरून ए निगेटिव्ह नियमित रक्तदाते ग्लोबल रक्तदाते मालवण संघटक श्री. राजू बिडये यांना सर्व माहिती याबाबत देण्यात आली. राजू बिडये यांनी ओरोस जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले आपले रक्तमित्र रुग्णसेवक श्री. राजेश पारधी यांच्याकडून पेशंटची सर्व रक्ताची असलेली गरज महिती करून घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच ओरोस हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले. राजु बीडये यांचे हे ३५ वे रक्तदान होते. आतापर्यंत रक्तदान शिबीर आयोजना सोबत नवतरुण पिढीमध्ये रक्तदानाची आवड निर्माण करून नवीन रक्तदाते तयार करण्याचं जीवनदायी कार्य राजू बीडये नेहमीच करत असतात.यावेळी राजू बीडये यांच्या सोबत गेलेल्या महेश सारंग याना इतर गरजू पेशंटला बी पॉझिटिव्ह ताज्या रक्ताची गरज असल्या बाबत समजले . त्यामुळे सारंग यांनी सुद्धा यावेळी रक्तदान केले . ए निगेटिव्ह गटाच्या रक्ताच्या दोन बॅग देऊन पण हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने अजून एक डोनर लागेल म्हणून ह्याच पेशंट करिता दुसऱ्या दिवशी पुन्हा मालवण रेवतळे येथील नियमित रक्तदाते श्री. देवल हडकर हे सकाळीच ओरोस हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करून आले. जेव्हा जेव्हा इमर्जन्सी रक्ताची गरज असते तेव्हा तेव्हा निस्वार्थ रक्तदाते आपला व्यवसाय, आपले काम ह्या सर्व गोष्टी बाजूला करून आपला बहुमूल्य वेळ या रक्तदान सेवेला देतात . तो ही स्व खर्चाने! अशाच निस्वार्थ रक्तदात्यांचा यादीतील ग्लोबल रक्तदाते संघटक श्री. राजू बिडये,देवल हडकर, महेश सारंग यांच्या या जीवनदायी रक्तदान सेवे बद्दल ग्लोबल रक्तदाते परिवाराने सुद्धा आभार मानले आहेत.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -