चिंदर | विवेक परब: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती ( महाराष्ट्र प्रांत ) फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, देवगड आणि स्वयंभू लिंगेश्वर प्रतिष्ठान, महाळुगे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि .२६ डिसेंबर २०२१ रोजी जि . प. पूर्ण प्राथमिक शाळा, महाळुगे – राणेवाडी येथे ” विज्ञानातील गमती – जमती ” या शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा लाभ गावातील ४२ विद्यार्थ्यांनी घेतला . तसेच गावचे सरपंच श्री. संदिप देवळेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. रामकृष्ण राणे व श्री. संजय तावडे आणि जनकल्याण समितीचे कोकण संभाग प्रयोगशाळा विषय प्रमुख श्री. हेमंत आईर सर, प्रकल्पाचे सहप्रमुख श्री. चेतन पुजारे, प्रकल्पाचे कार्यक्रम – उपक्रम प्रमुख प्राध्यापक श्री.निलेश तिर्लोटकर सर, प्रकल्प शिक्षक श्री. भगिरथ राणे सर त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. संजय मांजरेकर सर व सहाय्यक शिक्षक श्री.दौडीवार सर उपस्थित होते. या कार्यक्रमात हवेचा दाब, रासायनिक अभिक्रिया आणि अन्य गमतीशीर वैज्ञानिक प्रयोग विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच काही विज्ञानगीते घेण्यात आली . या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रस्तावित व आभार प्रदर्शन श्री. रामकृष्ण राणे यांनी केले.अशा वैज्ञानिक उपक्रमांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय व सामाजिक अशा दोन्हींचाही विकास होऊ शकतो असेच जिल्ह्यातील तज्ञ शिक्षक आणि विज्ञान अभ्यासकांचे म्हणणे आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -