आचरा / विवेक परब : आमदार. नितेश राणे यांना महाविकास आघाडी सरकार कूट कारस्थान करून अडकविण्याचा प्रयत्न झाल्यास ज्याचे पडसाद उमटतील त्याची सर्वस्वी जबादारी प्रशासनाचीच राहील.निवडणुकीच्या तोंडावर दहशत वादाचा नसलेला मुद्दा तयार करून भावनेच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात या भ्रमात असलेले आघाडीचे नेते कूट कारस्थान करण्यात मग्न असून जिल्हा बँक आपल्याला जिंकता येणार असं वाटत असेल तर तो भ्रम आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्तेचा वापर करून जिंकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे तो सुद्धा आम्ही हाणून पाडणार परंतु अटकेचा प्रयत्न झाला तर आम्हीही लोकशाही मार्गाने विरोध केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही . त्याचे पडसाद जिल्हा भर उमटतील असा इशारा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आज दिला.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -