नारी शक्ती!
कणकवली/ प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालकाने केले. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा लोकनेते शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून येते.
कोल्हापुरातील अंबप पाडळी गावाच्या पोलीस कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मा. उदय सामंतजी बसलेल्या गाडीचे सारथ्य केले.गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत .23 डिसेंबर, 2021 रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता.त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य बाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचाअभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा! मा.अजितदादा पवार यांचे वक्तव्य.