तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा वरचष्मा
चिंदर / विवेक परब : मालवण तालुक्यातील भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या गावात प्रतिष्ठेची ठरलेल्या रामेश्वर वि.वि.स.सोसायटी. लि च्या बहुचर्चीत निवडणूकीत शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या सोसायटीवर निर्विवाद वचस्व मिळवले.
विजयी उमेदवारांनमध्ये सिताराम हडकर, सतिष हडकर, दिगंबर जाधव, रविंद्र लब्दे, रश्मी पाताडे, संजय माळकर, सुनिल पवार, सुरेश साटम, सुरेश पारकर, आनंद पवार, विश्वास खरात, परेश चव्हाण संगिता जावकर यांचा समावेश आहे. या विजया नंतर बोलताना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले कि हा विजय सर्व सामान्य कार्यकर्त्यांचा तसेच संतोष कोदे, संतोष गांवकर व महेद्र मांजरेकर, दिपक कानविंदे व सर्व कार्यकर्त्यांचा असून सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले.